सीबीएसई बोर्डाने दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक केले जाहीर

 

CBSE board exam 2024 timetable announced: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२४ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता दहावीच्या व बारावीच्या परीक्षा येत्या १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होणार आहेत. १० एप्रिल २०२४ पर्यंत दहावीच्या परीक्षा चालणार आहेत. सुमारे ५५ दिवस या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थी cbse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक पाहू शकतात.Read more…

 

👉इयत्ता दहावी परीक्षेचे वेळापत्रक pdf स्वरूपात Download करण्यासाठी येथे क्लिक करा

 

सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता दहावीच्या महत्त्वाच्या विषयांचे वेळापत्रकात हिंदी विषयाची परीक्षा २१ फेब्रुवारीला, इंग्रजी विषयाची परीक्षा २६ फेब्रुवारीला आणि सामाजिक शास्त्र या विषयाची परीक्षा ७ मार्च २०२४ रोजी होणार आहे. त्यानंतर ११ मार्चला गणित आणि १३ मार्चला आयटीचा पेपर होणार आहे. इयत्ता १२ वीच्या परीक्षा २ एप्रिल २०२४ रोजी संपणार आहेत.www.cbse.gov.in

Read more…

 

👉इयत्ता बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक pdf स्वरूपात Download करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

असे आहे १२ वी चे वेळापत्रक

१५ फेब्रुवारी २०२४ : उद्योजकतेसह इतर विषयांची परीक्षा

१६ फेब्रुवारी २०२४ :जैवतंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान आणि इतर विषयांच्या परीक्षा (सकाळी १०.३० ते दुपारी १.३०)

१७ फेब्रुवारी २०२४ : अभियांत्रिकी ग्राफिक्स, कथकली नृत्य, फलोत्पादन, डेटा सायन्स आणि इतर विषय

१९ फेब्रुवारी २०२४ : हिंदी इलेक्टिव्ह आणि हिंदी कोअर परीक्षा

२० फेब्रुवारी २०२४ : फूड प्रोडक्शन, डिझाइन आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची परीक्षा

२१ फेब्रुवारी २०२४ : हिंदुस्थानी संगीतासह इतर विषयांची परीक्षा

२२ फेब्रुवारी २०२४ : इंग्रजी कोरची परीक्षा

२३ फेब्रुवारी २०२४ : रिटेल आणि इतर

२४ फेब्रुवारी २०२४ : टायपोग्राफी

४ मार्च २०२४ : भौतिकशास्त्र

९ मार्च २०२४ : गणित

👉इतर महत्त्वाच्या शैक्षणिक अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

👉 शैक्षणिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 

👉Old pension Yojana update