शैक्षणिक सहलीसाठी निम्म्या भाड्यातच एसटी बस मिळणार

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी निम्म्या भाड्यातच मिळणार लालपयी!

 

 

शैक्षणिक सहल update2023-24:शैक्षणिक सहल म्हटलं की विद्यार्थ्यांना मोठा आनंद होतो. त्यातच दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आता शाळा सुरू झाल्या असून सहलीचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून निम्मे भाडे आकारले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कमी पैशात जास्त प्रवास करून अधिक प्रेक्षणीय स्थळांना भेट देता येणार आहे.शैक्षणिक संस्था कडून बस बुक करणे सुरू असल्याचे रापमकडून सांगण्यात येत आहे.

Read more…

 

शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेता यावा त्यांना प्रेक्षणीय स्थळांची पाहणी करता यावी याकरता विविध स्थानांना भेटी देणे किंवा निसर्गसहलीचे आयोजन केले जाते.

 

दरम्यान दिवाळीनंतर फेब्रुवारीपर्यंत शाळांकडून शैक्षणिक सहलीचे नियोजन केले जाते.विद्यार्थ्यांना कमी पैशात जास्त प्रेक्षणीय स्थळांना भेटी देता याव्यात याकरिता प्रवास तिकिटात 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. दरम्यान 45 व्यक्तींची आसन क्षमता असणाऱ्या एसटीसाठी शाळांकडून 27 रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे पैसे घेण्यात येणार आहेत.

👉एसटी महामंडळाने आनली नविन योजना!

 

तसेच जिल्ह्यातील आठही आगारांतील बसेस मागणीनुसार उपलब्ध करून देणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्याकडून सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर,रायगड, महाबळेश्वर,पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक येथील प्रेक्षणीय स्थळांना प्राधान्य देण्यात आले होते.तसेच गडकिल्ले धार्मिक स्थळांचाही सहलीत समावेश होता. यावर्षी सुद्धा शैक्षणिक संस्थेच्या,विद्यार्थ्यांच्या मतानुसार वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत.

👉 जुनी पेन्शन योजना होणार लागू सविस्तर बातमी येथे पहा

 

👉सीबीएसई बोर्डाने दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक केले जाहीर

 

 

👉शैक्षणिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा