ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू:राज्य सरकारच्यावतीने गेल्या दोन तीन वर्षापासून ओबीसींना वसतीगृह व स्वाधारच्या धरतीवर आधार योजना लागू करण्यासंदर्भात आश्वासनाशिवाय काहीच मिळत नव्हते.मात्र विदर्भातील ओबीसी संघटनांनी सातत्याने याकरीता पाठपुुरावा करीत विविध आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले.त्यातच नागपूरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या नावे 1 लाख पोस्टकार्ड पाठविण्याचे अभियान हाती घेत 1 लाख स्वाक्षरीचे निवेदन देण्याची तयारी सुरु केली होती.

👉सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या सर्व गोष्टींची दखल अखेर राज्य सरकारला घ्यावी लागली असून पहिल्या टप्यात ओबीसी विद्यार्थ्याकरींता स्वाधारच्या धरतीवर विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करण्यासंदर्भातील शासन निर्णय आज 13 डिसेंबरला जारी करावा लागला आहे.

 

👉जुनी पेन्शन योजना होणार लागू सविस्तर माहिती येथे पहा

 

या शासन निर्णयानुसार ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात संधी मिळणार नाही,त्यांना लाभ मिळणार असून

  •  शहरी विभागासाठी ६००००रु ,
  • उपशहरी विभागासाठी, ५१०००रु आणि
  •  नागरी विभागासाठी ४१०००रू, व
  • तहसील विभागासाठी ३८०००रु मंजुर करण्यात आले आहे.
  • विदर्भातील ओबीसी युवा अधिकार मंच,ओबीसी अधिकार मंच,ओबीसी सेवा संघ,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी जनमोर्चा,ओबीसी क्रांती मोर्चा,भारतीय पिछडा शोषित संघसह विविध ओबीसी संघटनाच्या सातत्याच्या दबावामुळे आणि गेल्या 2 वर्षापासून मंडल जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून सातत्याने ओबीसींच्या विद्यार्थ्याकरीता स्वाधारच्या धरतीवर आधार योजना सुरु करण्याकरीता पाठपुरावा सुरु होता.त्यातच विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होताच 1 लाख पोस्टकार्ड अभियान व सह्यांचे निवेदनाची जय्यत तयारी सुरु असल्याचे बघून अखेर ओबीसी बहुजन मंत्रालयाने ओबीसीकरीता आधार योजनेचा शासन निर्णय आज जाहीर केला,हा खऱा विजय आहे.Read more..

 

👉शैक्षणिक सहलीसाठी निम्म्या भाड्यातच एसटी बस मिळणार

 

 

 

👉शैक्षणिक विद्यार्थी व कर्मचारी हिताच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा