एसटी महामंडळाने आनली नविन योजना!

एसटीबसने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

 

ST Mahamadal update:एसटीबसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळने तिकिटाची रक्कम ऑनलाइन देता येणार आहे. महामंडळाने प्रवाशांना QR-Code च्या मदतीने तिकिटाचे पैसे देण्याची सोय केली आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबणार असून, त्याचा फायदा प्रवाशांबरोबरच महामंडळालाही होणार आहे. एसटीच्या पुणे विभागातील सर्व आगारांमधून धावणाऱ्या एसटी बसमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे.

 

सध्याच्या जमान्यात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. चहावाल्यापासून ते मॉलपर्यंत सर्वत्र ग्राहक ऑनलाइन पैसे देतो. सर्व व्यवहारांत कॅशलेसवर भर देण्यात येत असताना एसटीचे तिकीट रोख रक्कम देऊनच काढावे लागत होते. त्यामुळे वाहक आणि ग्राहकांची सुट्ट्या पैशांवरून सातत्याने वादावादी होत होती. हे टाळण्यासाठी एसटीने पहिल्या टप्प्यात QR-Code च्या मदतीने तिकीट देण्याची सोय केली आहे.

 

👉एसटी महामंडळाच्या नवीन योजनेची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

पुढील टप्प्यात प्रवाशांना डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून तिकीट काढण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही. या प्रयत्नांमुळे वाहकांचीही रोख रक्कम सांभाळण्यापासून सुटका होणार आहे. महामंडळाने सर्व विभागांना ही सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.Read more…

 

👉शैक्षणिक सहलीसाठी निम्म्या भाड्यातच मिळणार एसटी बस सविस्तर बातमी येथे पहा

 

  • प्रवाशांसाठी हेल्पलाइनची सुरुवात  होणार..

ऑनलाइन तिकीट काढताना रक्कम वजा झाल्यास आणि तिकीट न मिळाल्यास प्रवाशांच्या मदतीसाठी महामंडळाकडून ‘४००’ या क्रमांकावर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. प्रवासी ८८००६८८००६ या क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवू शकतात. याशिवाय wecare@aritelbank.com येथे संपर्क साधूनही मदत मिळवता येणार आहे. हेल्पलाइनचे क्रमांक २४ तास उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

‘बसमध्ये माहितीफलक लावा’

एसटीचे तिकीट QR-Code द्वारे देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, अशा प्रकारची सेवा उपलब्ध केल्याची माहिती बसमध्ये लावण्याची गरज आहे. त्यासाठी QR-Code द्वारे तिकीट काढण्याची सोय असल्याचे फलक बसमध्ये लावण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.