Tet परीक्षा फेब्रुवारीत होणार..!

पहिली ऑनलाइन टीईटी परीक्षा फेब्रुवारीत….

 

Tet exam update: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेची (Tet ) तयारी अंतिम टप्प्यात असून येत्या फेब्रुवारी महिन्यात पहिली Online Tet परीक्षा घेण्यात येणार आहे. Tet परीक्षेच्या जाहिरातीचे काम पूर्ण झाले असून जानेवारी महिन्यात परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे.

 

👉सविस्तर शासन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बहुसंख्य उमेदवार शिक्षक भरतीसाठी आस लावून बसलेले आहेत. शिक्षक होण्यासाठी Tet परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ह्या परीक्षेचे आयोजन केले जाते.

 

परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात-

 

फेब्रुवारी महिन्यात घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची तयारी अंतिम टप्यात आलेली आहे. सध्या परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा केंद्र निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्यात सर्वत्र विविध पदांच्या भरतीच्या ऑनलाइन परीक्षा घेतल्या जात आहेत. मार्च महिन्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच Tet exam घ्यावी लागणार आहे. त्यानंतर Online exam घेण्यासाठी परीक्षा सेंटर मिळणे अवघड होणार.Read more.

 

 

परिषदेतर्फे फेब्रुवारी 2024 मध्ये पहिली Online Tet exam घेतली जाणार आहे. आतापर्यंतच्या सर्व परीक्षा या Offline अर्थात OMR sheet वर घेतल्या जात होत्या. आता इतर परीक्षांप्रमाणे Tet exam सुध्दा आता ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यामुळे सध्या परीक्षेच्या तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत. ऑनलाइन परीक्षेसाठी राज्यात उपलब्ध असलेलया परीक्षा केंद्रांच्या तारखा मिळवण्याचे काम सुरू आहे.