ZP Recruitment 2023: राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये तब्बल 19460 पदांसाठी ‘मेगाभरती’.. असा करा अर्ज…

ZP Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि चांगली गुड न्यूज आहे. मित्रांनो तुमचं माझं आणि आपल्या मित्रांचा सर्वांचं किमान जेमतेम शिक्षण पूर्ण झालेला आहे म्हणजेच किमान बारावी तरी आपले शिक्षण झालेलं आहे शिक्षण झाल्यानंतर आपली सर्वांचीच एक इच्छा असते ती म्हणजे आपल्याला एका कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली जेणेकरून आपण आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकू.

आणि आपलं एक स्वप्न असतं ते म्हणजे आपल्याला एखादी तरी कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी मिळावी. तर या लेखाच्या माध्यमातून मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे ती म्हणजे आपल्या सरकारने म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये म्हणजेच सर्व जिल्ह्याच्या जिल्हा परिषदांमध्ये तब्बल 19 हजार हून अधिक जागांसाठी मोठी मेगा भरती काढले आहे आणि ही तुमच्यासाठी माझ्यासाठी एक मोठी संधी आहे. ही मेगा भरती जिल्हा परिषद मधील क गटातील पदांसाठी होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये काम करण्याची ही एक मोठी संधी आहे.

येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभाग अंतर्गत सर्व जिल्हा परिषद मध्ये सरळ सेवेमध्ये क गटातील जागांसाठी ही भरती होणार आहे या भरतीमध्ये जवळजवळ म्हणजेच तब्बल 19460 रिक्त पदे भरली जाणार आहेत. आणि या भरतीवरची घोषणा देखील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब यांनी स्वतः याबद्दलची घोषणा केलेली आहे. तसेच या जिल्हा परिषदांमधील भरतीमध्ये शंभर टक्के जागा ह्या आरोग्य विभागामधील बदलत येणार आहेत आणि उर्वरित इतर विभागामधील 80 टक्के जागा भरल्या जाणार आहेत आणि ही भरती सरळ सेवेने होणार आहे.

खालील पदांसाठी ही भरती होणार आहे:
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माण अधिकारी, (कनिष्ठ), सहाय्यक लिपिक कनिष्ठ, सहाय्यक लेखा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रेगमन, लघुलेखक उच्च श्रेणी, वरिष्ठ सहाय्यक, लिपिक, वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, आणि त्याचबरोबर इतर जे अनेक पद असतात त्यांच्यासाठी ही भरती होणार आहे.ZP Recruitment 2023

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

अर्जाची तारीख:
मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र जिल्हा परिषदेमधील मेगा भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागणार आहे.

पात्रता:
मित्रांनो तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल त्या त्या पदाची वेगवेगळी पात्रता आहे यासाठी तुम्हाला जिल्हा परिषद भरतीच्या ऑनलाईन ची वेबसाईट आहे म्हणजेच संकेतस्थळ आहे त्यावर सर्व माहिती नमूद केलेले आहे त्या संकेतस्थळाला तुम्ही एक वेळेस अवश्य भेट द्या.

अर्ज शुल्क:
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मध्ये ही मोठी मेगा भरती होत आहे आणि ही भरती एकाच वेळेस घेतली जाणार आहे आणि या भरतीची परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यासाठी तुम्हाला तुम्ही जर ओपन म्हणजेच खुल्या प्रवर्गाकडून असाल तर तुम्हाला 1000 हजार रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे व तुम्ही जर आरक्षण म्हणजेच आरक्षित प्रवर्गाकडून असाल तर 900 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे.

येथे करा अर्ज;
मित्रांनो ही जिल्हा परिषदेमधील भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज भरावा लागणार आहे त्यासाठी तुम्हाला http://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

येथे क्लिक करा 

कृषी विभागात 218 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी!

Leave a Comment